आरती विघ्नहराची
चाल - ओम जय जगदीश हरे
ओम जय जय विघ्नहरा
देवा जय जय विघ्नहरा
वंदन तुजला आमुचे
वंदन तुजला आमुचे
जोडूनी दोन्ही करा
ओम जय जय विघ्नहरा IIधृII
पार्वती सांब सदाशिव
असती जनक तुझे
देवा असती जनक तुझे
रिद्धी सिद्धी तव ललना
रिद्धी सिद्धी तव ललना
वाहन मूषक तुझे II१II
तू बुद्धीचा दाता
कर्ता अन धर्ता
देवा कर्ता अन धर्ता
भक्तगणांचा त्राता
भक्तगणांचा त्राता
म्हणविसी विघ्नहर्ता II२II
विघ्नासूर हरविला
शरण तुला आला
देवा शरण तुला आला
भक्त रक्षणासाठी
राहसी ओझरला
ओम जय जय विघ्नहरा II३II
शुभकार्याच्या आरंभी
प्रथम तुझी पूजा
देवा प्रथम तुझी पूजा
तुझिया दारी आलो
तुझिया दारी आलो
पूर्ण करी काजा II५II
रचना - प्रा.जयसिंग गाडेकर
आळे, ता- जुन्नर,जि- पुणे
मोबाईल-४१२४११
(सर्व हक्क राखीव. लेखकाच्या परवानगीशिवाय कुठेही प्रक्साहित करण्यास सक्त मनाई आहे.)