शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

आरती विघ्नहराची

चाल - ओम जय जगदीश हरे

 

ओम जय जय विघ्नहरा

देवा जय जय विघ्नहरा

वंदन तुजला आमुचे  

वंदन तुजला आमुचे

जोडूनी दोन्ही करा

ओम जय जय विघ्नहरा IIधृII

 

पार्वती सांब सदाशिव

असती जनक तुझे 

देवा असती जनक तुझे

रिद्धी सिद्धी तव ललना

रिद्धी सिद्धी तव ललना

वाहन मूषक तुझे IIII

 

तू बुद्धीचा दाता

कर्ता अन धर्ता 

देवा कर्ता अन धर्ता

भक्तगणांचा त्राता

भक्तगणांचा त्राता 

म्हणविसी विघ्नहर्ता IIII 

 

विघ्नासूर हरविला

शरण तुला आला

देवा शरण तुला आला

भक्त रक्षणासाठी

राहसी ओझरला

ओम जय जय विघ्नहरा IIII

 

 

शुभकार्याच्या आरंभी

प्रथम तुझी पूजा  

देवा प्रथम तुझी पूजा  

तुझिया दारी आलो

तुझिया दारी आलो

पूर्ण करी काजा IIII

 

रचना - प्रा.जयसिंग गाडेकर

आळे, ता- जुन्नर,जि- पुणे

मोबाईल-४१२४११  

(सर्व हक्क राखीव. लेखकाच्या परवानगीशिवाय कुठेही प्रक्साहित करण्यास सक्त मनाई आहे.)

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरती विघ्नहराची चाल - ओम जय जगदीश हरे   ओम जय जय विघ्नहरा देवा जय जय विघ्नहरा वंदन तुजला आमुचे   वंदन तुजला आ...